Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

शाळा सिद्धी

(Pdf)


शाळा सिद्धी गुण(pdf) 



शाळा सिद्धी (ppt) 


शाळा सिद्धी Google Chrome ओपन करा.

Address बार मध्येwww.shaalasiddhi.nuepa.orgटाईप करुन Enter  दाबा.किंवा वरील लिंक वरती क्लिक करा.NPSSE ची विंडो ओपन होईल.

त्यामध्ये Login च्या box मध्ये  "Create New Account" या पर्यायावर क्लिक करा.


🌸Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये"User Name / UDISE" च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.त्याखाली असलेल्या "Password" च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा.लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे


🌸.त्याखाली "E-mail" च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.त्याखाली "Role Type" या पर्यायासमोर"School User" हा पर्याय निवडा

🌸.वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या  Submit" या पर्यायावर क्लिक करा.आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.आता आपल्या शाळेचा DASHBOARD बघूया.डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या LOGIN  या पर्यायावर क्लिक करा.

🌸LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये "USER TYPE  च्या समोर  School User हा पर्याय निवडा.त्याखाली आपल्या शाळेचा  UDISE Code टाईप करा.पासवर्ड टाकून "Submit" या पर्यायावर क्लिक करा.आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.शाळेची Basic Information भरणे.आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला"Basic information" दिसते.

🌼त्यामध्ये Learner's या पर्यायाखाली :1) Demographic Profile2) Attendance Rate3) Performance in key subjects4) Learning OutcomesTeachers या पर्यायाखाली1) Numbers of Teachers2) Teacher's Attendanceवरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरुनका.

🌸7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.मित्रांनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला "7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL च्या खालीसर्व 7 क्षेत्र दिसतील.शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.