Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

C. V. S. फाईल तयार करणे


🌼xls फाईल चे .csv फाईल रुपांतर करणे 🌼


🌞. अगोदर तुम्ही माहिती भरलेली 
    .xls फाईल कुठंतरी कॉपी पेस्ट करा 
    जसे डेस्क्टटॉप वर किंवा एखाद्या 
    फोल्डरमधे 

🌞. ती फाईल ओपन करा 

🌞.  आता ही ओपन केलेली फाईल 
     पुन्हा सेव करायची आहे 
     त्याकरीता Save as या ड्रापडाऊन
     मेनूला क्लिक करा
     (मेनूबार वरील File या मेनूला क्लिक
     केले की Save as ऑप्शन मिळतो. 
     विंडोज 7 मधे हा आयकॉन 
     डाव्याबाजूला वरच्या कोपऱ्यात 
      गोल आकारात असतो )
 🌞. Save as ला क्लीक केले की 
     एक मेसेज विंडो डिस्प्ले होते

🌞  त्यामधे फाईल नेम व फाईल टाईप 
     अशा दोन पट्टया येतात

🌞फाईल नेम कोणत्याही परिस्थितीत
     बदल करायचे नाही 
     जर फाईल नेम आलेच नाही तर 
     मेसेज बॉक्समधे फाईलचे पहिले
     अक्षर टाईप केले की यादी दिसेल 
     त्यापैकी एक योग्य नाव निवडा

🌞   फाईल प्रकारला क्लिक केले की एक 
      लांबलचक यादी / ड्रॉपडाऊन मेनू
      दिसतील. यापैकी comma delimited 
      हा प्रकार निवडा

🌞   Save ला क्लिक करा 

🌞  पुन्हा एक मेसेज विंडो डिस्प्ले 
       होईल तिला ओके करा 

🌞  बाहेर निघा 

🌞 तुमच्या फाईलच्या आयकॉनवर 
      small "a" आलेला दिसेल 

🌞. तुमची .csv फाईल तयार होईल