Pages

मी संतोष लक्ष्मण खाडम जिल्हा परिषद शाळा-गौळपाडा ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक आपले माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे. "चला तर मग तंत्रस्नेही बनुया प्रगत महाराष्ट्र करुया"

09 April, 2017

श्रेणी नुसार गुण विभागणी

[
✴संकलित  चाचणी श्रेणीनुसार गुण विभागणी  खालील प्रमाणे आहे.✴
*शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*
✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾

👉🏿 *वर्गाचे शेकडा प्रमाण*

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  --------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83

➖➖➖

👉🏿 *शाळेचे शेकडा प्रमाण*

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

2 री   - 72%
3 री   - 85.5%
4 थी  - 91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
----------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%


ही गुण विभागणी खालील  टक्केवारीशी जुळते


टक्केवारीनुसार श्रेणी
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇ 
८१% ते १००% --- अ 
६१% ते ८० %---- ब 
४१% ते ६० %----क 
० %ते ४० %-----ड

गुणानुसार श्रेणी 
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
✅1 ली व इ.२ री .... ३० गुण 

२५ ते ३० ----- अ                 
१९ ते २४----- ब 
१३ ते १८----- क 
० ते  १२----- ड 

✅इ.३री व इ. ४ थी ......४० गुण 

३३ ते ४० ---अ 
२५ ते ३२---- ब
१७ ते २४----क
० ते १६ ----- ड

✅इ.५ वी व इ.६ वी ..... ५० गुण 

४१ ते ५०------ अ 
३१ ते ४०------ ब 
२१ ते ३० ------- क 
० ते २० -------ड

✅इ.७ वी व  इ. ८ वी .......६० गुण 
४९ ते  ६० ------अ 
३७ ते ४८ ------ब 
२५ ते  ३६ -----क 
० ते  २४ ------ड
     धन्यवाद........ 
]

06 April, 2017

संकलित मूल्यमापन 2 मराठी व गणित गुणनोंद तक्ते


संकलित मूल्यमापन चाचणी - 2 
गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी 
👇 👇 👇 👇 👇 
इयत्ता  मराठी   गणित  
पहिली  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
दुसरी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
तिसरी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
चौथी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
पाचवी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
सहावी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
सातवी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 
आठवी  डाउनलोड करा  डाउनलोड करा 

शालेय पोषण आहार उपयोगिता 1ते5 व 6ते8 साठी

मित्रांनो वर्षेभर असणारी शालेय पोषण आहार माहिती एका क्षणार्धात म्हणजेच 5 मिनिटात तुम्ही तुमच्या शाळेची वार्षिक उपयोगिता तयार करू शकता  आणि त्यासाठी Computer लागेल असे नाही तुम्ही मोबाईल वर अॉपरेट करु शकता बनवू शकता. 

पुढिल बाबी त्यात भरा

1)मागील एप्रिल शिल्लक भरा
2)प्रत्येक महिन्याचे लाभार्थी भरा (तांदूळ चे भरा बाकी आपोआप येइल व डाळी यांचे भरा पहिल्या शिटवर)  
3)कार्यदिन भरा
4)इंधन भाजीपाला प्रमाण भरा
5)प्रत्येक महिन्याचे प्राप्त भरा
बाकी आपोआप होइल
6) तुम्ही ही फाईल  मोबाईल वर देखील अॉपरेट करू शकता

डाउनलोड करण्यासाठी 👇👇👇👇👇👇 क्लिक करा